PM KISAN E KYC मुदत वाढविण्यात आली आहे

 

 

 
 
ई-केवायसीसाठी घरी बसून नोंदणी कशी करावी
 
घरी बसून ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान पोर्टलला भेट द्या. https://pmkisan.gov.in/ येथे तुम्हाला प्रथम फार्मर्स कॉर्नर आपल्या उजव्या बाजूला eKYC ची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल. येथे तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा .
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM kisan) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने  योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख  पडताळणी (pm kisan ekyc ) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने  7 सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतीमध्ये आपल्या ओळखीसाठी आपली E kyc करणे आवश्यक आहे
 
 
 
सर्व शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे.आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यात आलेला आहे. राज्यात २६ मे २०२२ अखेर एकुण ५२ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत:अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या 7 सप्टेंबर २०२२ च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
 

 
 


 आपण विविध योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *