शेतकऱ्यांना मिळणार शंखी गोगलगाय नुकसान भरपाई चालू हंगाम २०२२
अतिवृष्टी , पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्तीप्रतीसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरता मदत देण्याबाबत दि .१०/०८/२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन, शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रं.सीएलएस-2022/प्र.क्र.253/म-3, दि .२२/०८/२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी , पूर यासारख्या नैसगिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव प्रमाणे निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.

