महसूल विभाग अंतर्गत (Talathi Bharti 2023) ‘तलाठी’च्या ३६२८ पदांची भरती होणार....

 Talathi Recruitment 2023 for 3628 post



महसूल विभाग अंतर्गत (Talathi Bharti 2023) ‘तलाठी’च्या ३६२८ पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला. आता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, कोकण  नागपूर विभागात, अमरावती विभागात,  तर पुणे विभागात अशा एकूण ३६२८ पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं
Talathi Bharti 2023 Vacancy Details

राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे.


यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या.
1) पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
2) अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
3) नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
4) औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
5) नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
6)कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.

त्यामध्ये जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे-
पुणे

    पुणे- ३३१, ५५
    सातारा- ७७,१२
    सांगली- ५२,०९
    सोलापूर- १११,१९
    कोल्हापूर- ३१,०५

अमरावती

    अमरावती- ३४,०६
    अकोला- ०८,०१
    यवतमाळ- ५४, ०९
    बुलढाणा- १०,०२
    वाशीम- ०,०

नागपूर

    नागपूर- ९४,१६
    चंद्रपूर- १३३,२३
    वर्धा- ५०,०८
    गडचिरोली- ११४,१९
    गोंदिया- ४९,०८
    भंडारा- ३८,०६

औरंगाबाद

    औरंगाबाद- ११७,१९
    जालना- ८०,१३
    परभणी- ७६,१३
    हिंगोली- ६१,१०
    बीड- १३८,२३
    नांदेड- ८४,१४
    लातूर- ३९,०७
    उस्मानाबाद- ९०,१५

नाशिक

    नाशिक- १७५,२९
    नंदुरबार- ०,०
    धुळे- १६६,२८
    जळगाव- १४६, २४
    अहमदनगर- २०२,३४

कोकण

    मुंबई- १९, ४
    मुंबई उपनगर- ३१, ३
    पालघर- ८६,१६
    ठाणे- ७२,१०
    रायगड- १४०,२२
    रत्नागिरी- १०३, १८
    सिंधुदुर्ग- ९९,१८

अशाप्रकारे एकुण ३११० तलाठी साझे आणि ५१८ महसूली मंडळी अशा एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे.

शासन निर्णय :-

अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उप समितीने दि.२८.१.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दि. २९.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूली मंडळ कार्यालयांसाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. https://sarthicorner.blogspot.com/2022/12/talathi-bharti-2023.html

  @Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.








 पोस्ट शेअर करा !!!

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *